Friday, August 12, 2011

कसा आज कंठात येईल सूर...

प्रिया आज माझी नसे साथ द्याया
नको धूंद वारे, नको चांदण्या या

नको पारिजाता धरा भूषवू ही
पदांची तिच्या आज चाहूल नाही
प्रियेविण आरास जाईल वाया

फुले सान झेलू, तरी भार होतो
पुढे वाट साधी, तरी तोल जातो
कुणाला कळाव्या मनाच्या व्यथा या

न शांती जीवाला, ना प्राणांस धीर
कसा आज कंठात येईल सूर
उरी वेदना मात्र जागेल गाया

आता आठवी का तशा चांदराती
उरे मौतिकावीण शिंपाच हाती
उशाला उभी ती जुनी स्वप्नमाया



No comments: